Wednesday, March 05, 2014

Summer specials on konkan railway

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकणवासीयांना जादा 'एसी' एक्स्प्रेस गाड्यांचा फायदा घेता येणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये ३ एप्रिल ते ५ जून कालावधीत मुंबई ते करमाळी एसी एक्स्प्रेसच्या जादा २० गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यासह मुंबई-जनशताब्दी एक्स्प्रेसवर जादा डबे जोडण्यात येणार आहेत.
उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दीवर तोडगा काढण्यासाठी कोकण रेल्वेवर २० जादा 'एसी' स्पेशल एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहे. ही एसी स्पेशल एक्स्प्रेस ३ एप्रिल ते ५ जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)वरून सुटणार आहे. ही गाडी मध्यरात्री १२.५५ वाजता सुटणार असून करमाळीस सकाळी ११ वाजता पोहोचेल.
परतीच्या मार्गावर दर गुरुवारी दुपारी २ वाजता सुटणार असून एलटीटीला मध्यरात्री १२.२० वाजता पोहोचणार आहे. या गाडीस ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ असे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीला एक एसी फर्स्ट क्लास, तीन एसी-टू टायर, आठ एसी थ्री टायर, पँट्री कार डबे असतील.
जनशताब्दीस जादा डबे
दादर-मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसला १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत जादा डबे जोडण्यात येणार आहेत. त्यात दोन अतिरिक्त सेकंड क्लास चेअर कार आणि एक अतिरिक्त एसी चेअर कारचा समावेश आहे.

via Maharashtra Times

No comments:

Google
 

...